शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळाचा गत दोन वर्षांचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:14 IST

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठी चित्रपसृष्टीची शिखरसंस्था असलेले ‘ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ’ निद्रितावस्थेत आहे. महामंडळावर निवडून गेलेल्या विद्यमान संचालकांनी दोन वर्षांत एक-दोन कार्यक्रमवगळता सुमार कामगिरी केली आहे. हितसंबंध, मागील संचालकांच्या कारभाराविरुद्धच्या कुरबुरी, न्यायालयीन प्रक्रिया यातच गुरफटल्याने मराठी चित्रपटसृष्टीसमोरील अडचणींकडे आणि नावीन्यपूर्ण कल्पना कृतिशीलपणे राबविण्याकडे दुर्लक्ष ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठी चित्रपसृष्टीची शिखरसंस्था असलेले ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ निद्रितावस्थेत आहे. महामंडळावर निवडून गेलेल्या विद्यमान संचालकांनी दोन वर्षांत एक-दोन कार्यक्रमवगळता सुमार कामगिरी केली आहे. हितसंबंध, मागील संचालकांच्या कारभाराविरुद्धच्या कुरबुरी, न्यायालयीन प्रक्रिया यातच गुरफटल्याने मराठी चित्रपटसृष्टीसमोरील अडचणींकडे आणि नावीन्यपूर्ण कल्पना कृतिशीलपणे राबविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.एकेकाळी कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीचे केंद्र असल्याने त्याची शिखरसंस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना झाली. गेल्या ५० वर्षांत महामंडळावर नियुक्त झालेल्या सर्व अध्यक्ष व संचालकांनी महामंडळाच्या लौकिकात भरच टाकली, त्याला अपवाद ठरली ती सन २०१०-१५ या काळातील कार्यकारिणी. या काळात घडलेल्या घटनांनी महामंडळाची प्रतिमा पार डागाळली. परिणामी त्याविरोधात रान उठविलेल्या सभासदांच्या पॅनेलला सन २०१५ला निवडून दिले. या कार्यकारिणीकडून फार अपेक्षा होत्या.मराठी चित्रपटांच्या अनुदानाचा प्रश्न रेंगाळला आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीत, वितरण व्यवस्था सक्षम नाही, चित्रपट व्यवसायापुढील प्रश्न अशा अनेक अडचणी असताना त्यावर ठोस उपाययोजनांचा विचार होत नाही. शासनदरबारी काम व्हावे यासाठी कृतिशील पाऊल उचलले जात नाही. शासनदरबारी महामंडळाने काही मागण्या केल्या आहेत. मात्र. त्यांची फारशी दखल सांस्कृतिक खात्याकडून घेतली जात नाही.सर्वसाधारण सभेला बगलआर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील सहा महिन्यांत चित्रपट महामंडळाची सर्वसाधारण सभा होणे गरजेचे असते.मात्र, नवी कार्यकारिणी अस्तित्वात आल्यापासून एक विशेष सभा सोडली तर एकही सर्वसाधारण सभा घेतलेली नाही.मागील कार्यकारिणीच्या कामाबद्दल सध्या न्यायालयीनप्रक्रिया सुरू आहे, तिचा निकाल कधी लागेल माहीत नाही.पण विद्यमान कार्यकारिणीनेसुद्धा आपल्या तीन वर्षांतील कामाचा अहवाल सभासदांपुढे ठेवलेला नाही. त्यामुळे ‘महामंडळाचे नेमके काय चाललंय,’ अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.शाखा विस्तारकोल्हापूर हे चित्रपट महामंडळाच्या घडामोडींचे प्रमुख केंद्र आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या शहरांत शाखा वाढवून महामंडळाची सभासद संख्या वाढविली जात आहे. महामंडळाचे मुख्य कार्यालय पुण्याला हलविले जावे, अशी काहीजणांची मागणी आहे. बरेच कार्यक्रम मुंबई-पुण्यातच होतात; त्यामुळे झालेले सभासद हे खरेच चित्रपट व्यावसायिक आहेत का, याची पÞडताळणी केली जावी, अशी काही चित्रपट व्यावसायिकांची मागणी आहे.